१८.१.२३

* सोसता सोसता घाव झाला जुनासोसता सोसता घाव झाला जुना

 जीवना दे मला तू नवी वेदना


गाळती लोक हे आसवे कोरडी -

कोणता शाप हा तू दिला लोचना


कापरासारखे जाळले तू जरी

भाकली ना तरी मी तुझी प्रार्थना


दुःख दे एवढे तृप्त व्हावी व्यथा - 

आणखी ना दुजी वेगळी कामना


जन्म झाले किती हेच आहे सुरू

 जिंकलो मी सदा हारली यातना !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: