तापतो आत लाव्हारसासारखा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
तापतो आत लाव्हारसासारखा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

तापतो आत लाव्हारसासारखा

तापतो आत लाव्हारसासारखा;
सांग मी शांत राहू कसा सारखा ?

बैसली यौवनी गालफाडे तुझी

स्पष्ट सांगे मला आरसा सारखा.

योजना आखुनी जाळतो का मला ?
भ्रष्ट ना मी तुझ्या कापसासारखा.

सांग सोडू कसा आज पाण्या तुला ?
कोरडा होत आहे घसा सारखा.

ओळखा तेच हे दिव्य मारेकरी;
त्या बुटांचा बघा हा ठसा सारखा.

पूर देतो कुणा, थेंबही ना कुणा;
धूर्त झालास तू पावसासारखा.

मार्ग काहीतरी काढ यातून रे;
हार मानू नको तू असा सारखा.

सोबतीचे जरी सर्व झाले पशू;
तू तरी वागना माणसासारखा!

---------------------------------------
('दिशा' दिवाळी 1986)