आजन्म रोज ज्यांनी केले नवे तमाशे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आजन्म रोज ज्यांनी केले नवे तमाशे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आजन्म रोज ज्यांनी केले नवे तमाशे

आजन्म रोज ज्यांनी केले नवे तमाशे;
तिरडीस तेच माझ्या झाले फितूर वासे.

मैत्री करून जमले बगळे सभोवताली;
टिपले हळूच त्यांनी माझ्या खिशात मासे.

दिसलेत मानभावी, होते कसाब सारे;
भिडले गळ्यास माझ्या त्यांचे उदार फासे.

अभिजात तोतयांनी केली हवेत भेसळ;
माझ्या मुक्या चुलीच्या देहात रक्त नासे.

फसव्या कटात त्यांनी केली शिकार माझी;
सोलून कातडीचे केलेत ढोल-ताशे.