हलवायाशी पटले नाही लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हलवायाशी पटले नाही लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

हलवायाशी पटले नाही

हलवायाशी पटले नाही;
म्हणून लागे कडू मिठाई.

खूप ढोसली...शिव्या घातल्या...
झोप तरी का लागत नाही.

'हा' ही माझा,...'तो' ही माझा;
निष्ठा झाली 'चालू' बाई!

पोट भरे का गझलांनी रे;
जरा चाख तू 'राज'मलाई!

शिखरावरती दुःख भेटते;
आनंदाने करा चढाई!