तिचा शब्द माझ्या भिडे काळजाला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
तिचा शब्द माझ्या भिडे काळजाला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

तिचा शब्द माझ्या भिडे काळजाला


तिचा शब्द माझ्या भिडे काळजाला;
तुटे जीव माझा कळू दे रमाला.

जरी पत्र सांगे मुलांची खुशाली,
तरी चैन काही पडे ना जिवाला.

तिच्या कंठण्याची कुठे सांग सीमा;
कुठे अंत आहे तिच्या सोसण्याला.

इथे दूर देशी मला आच लागे;
उभे दु:ख तेथे तिला जाळण्याला.

तिच्या काळजीने कधी खिन्न होतो,
परी वेळ नाही मला थांबण्याला.


(असंग्रहीत/प्रसिद्धी: ‘अस्मितादर्श’
धम्मदीक्षा सुवर्ण महोत्सवी विशेषांक २००६)