फुले कागदी बघता इथली फूल माळणे जमले नाही लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
फुले कागदी बघता इथली फूल माळणे जमले नाही लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

फुले कागदी बघता इथली फूल माळणे जमले नाही

फुले कागदी बघता इथली फूल माळणे जमले नाही;
बागेच्या ह्या रूपावरती मला भाळणे जमले नाही.

दुकान मांडुन विकल्या जाती जेथे वचने,आणाभाका;
त्या प्रेमाच्या बाजाराचा शब्द पाळणे जमले नाही.

दिवे भेटले अनेक पण ते अंधाराचे मिंधे होते;
पतंग होउन अशा दिव्यांवर जीव जाळणे जमले नाही.

प्रत्येकाच्या पापणीतला अथांग सागर जेव्हा कळला;
थेंब एकही अश्रूंचा मग मला ढाळणे जमले नाही.

झाले नसते तशी कधीही कोण्या दुःखाची मी राणी;
हट्टच धरला दुःखांनी मग मला टाळणे जमले नाही.
------------------------------
('मेनका' दिवाळी 1982)
■ लेखन : २९ ऑगस्ट १९८२