कधी संतापण्यासाठी कधी गोंजारण्यासाठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कधी संतापण्यासाठी कधी गोंजारण्यासाठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कधी संतापण्यासाठी कधी गोंजारण्यासाठी ;
गझल मैत्रीण झालेली मला समजावण्यासाठी.

मनाच्या द्वाड घोड्याला सदा ताब्यात ठेवावे,
पुढे नसणार बाळा मी तुला सांभाळण्यासाठी.

इथे मी दूर एकांती सुखाने झोपलो आहे ;
नको येऊ इथे दुनिये मला भंडावण्यासाठी.

नको तू 'प्रेमिका ' होऊ, नको तू 'बायको ' होऊ ;
जगाला 'नाव ' ठेवू दे तुला बोलावण्यासाठी.

चितेची राख थोडीशी तुझ्या बागेत टाकावी ;
फुलांचा जन्म घेइन मी तुला शृंगारण्यासाठी