खाणीत कोळशांच्या मी शोधतो हि़-याला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
खाणीत कोळशांच्या मी शोधतो हि़-याला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

खाणीत कोळशांच्या मी शोधतो हि ऱ्याला

खाणीत कोळशांच्या मी शोधतो हि ऱ्याला;
पॉलीश स्टीलची ही प्रत्येक चेहऱ्याला !

शेवाळल्या नद्या अन झाले गढूळ पाणी;
आता तहान माझी सांगू कशी झ-याला?

चौफेर नांदणारे माहेर दहशतीचे;
जावे कुण्या ठिकाणी निर्धास्त आस-याला?

ऐकून शुभ्र ख्याती येऊ नका बघाया;
बंबाळ घाण येते ह्या सभ्य कोप-याला.

जखमेस न्याय आता सांगा कसा मिळावा?
सामील रक्त झाले निर्ढावल्या सु-याला!
---------------------------------------------------
('दऊत लेखणी' वर्धापन 1982)