असे जीवना तू किती घात केले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
असे जीवना तू किती घात केले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

असे जीवना तू किती घात केले

असे जीवना तू किती घात केले;
मला तू खरेदी लिलावात केले.

किती झाकल्या मी व्यथा अंतरीच्या;
उगा स्पष्ट त्यांना खुलाशात केले.

तुला सांग दुःखा कसा मित्र मानू?
हवे तेवढे तू न आघात केले.

तुला एक साधे कमळ दे म्हणालो;
किती खून तू या तलावात केले.

पुरे खंडले रे अखंडत्व माझे;
किती खंड माझे नकाशात केले.

तुला शोभले का अरे ईश्वरा हे-
भिका-याप्रमाणे पुढे हात केले.