रोगापेक्षा दवा भयंकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रोगापेक्षा दवा भयंकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रोगापेक्षा दवा भयंकर

रोगापेक्षा दवा भयंकर
वैद्य जुन्याहुन नवा भयंकर

प्राणपणाने बडवा डबडे
बसे पिकावर थवा भयंकर

पोकळ आहे अवघा वाडा
ख्यातीचा गवगवा भयंकर

सणासुदीला खुशाल लुटतो
मिठाईतला खवा भयंकर

निवडणुकीची शेका पोळी
पहा तापला तवा भयंकर

गुदमरताना श्वास बोलला -
भोवतालची हवा भयंकर