घ्यावी मना नव्याने तू एकदा उभारी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
घ्यावी मना नव्याने तू एकदा उभारी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

घ्यावी मना नव्याने तू एकदा उभारी

घ्यावी मना नव्याने तू एकदा उभारी;
तेव्हा फिटेल मित्रा,दुःखातली उधारी.

माझ्या चिल्यापिल्यांचा हिसकून घास नेतो;
समजाव पावसाला,माझी चुकेल वारी.

बापास बाप ना तू,आईस माय म्हणतो;
शिणलास व्यर्थ पुत्रा,हिंडून धाम चारी.

कर दूर गौतमा तू शंका यशोधरेची-
नव्हते घरात का ते,जे शोधलेस दारी?