त्याच त्या झंझटी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
त्याच त्या झंझटी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

त्याच त्या झंझटी सोड तू

त्याच त्या झंझटी सोड तू
फालतू बंधने तोड तू.

मी दिली सर्व बाकी तुझी;
नाव माझे अता खोड तू.

लागती फास ज्यांचे गळा;
सात शपथा अशा मोड तू.

बोलण्याचा पुरे गोडवा;
ओठ कर आपले गोड तू.

तोडल्या चौकटी मी जुन्या;
भिंत ती तेवढी फोड तू.

कुंपणाची नको काळजी;
देश माझा तुझा जोड तू.