तू दगडांना जीव लावला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
तू दगडांना जीव लावला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

तू दगडांना जीव लावला

तू दगडांना जीव लावला,चुकले पोरी
पाषाणांचा अंत पाहिला,चुकले पोरी

कधीच नाही शकुन मानला माणुसकीचा
तू देवांना कौल लावला,चुकले पोरी

इथे उद्याचा नसे भरवसा काडीचाही
तू परवाचा बेत आखला,चुकले पोरी