त्या वाटेने प्रवास देवा नको आणखी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
त्या वाटेने प्रवास देवा नको आणखी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

त्या वाटेने प्रवास देवा नको आणखी

त्या वाटेने प्रवास देवा नको आणखी;
वळणावरचा सुंदर धोका नको आणखी.

तुटण्यासाठी गुंतत जाणे सतरा वेळा;
त्या धाग्याचा मनास टाका नको आणखी.

नकोस बोलू गोड एवढे...शंका येते;
पुन्हा चाखणे त्या जहराला नको आणखी.

कोटी इच्छा झाल्या पैदा तृष्णेपोटी;
विस्ताराचा पुरे पसारा,नको आणखी.

निरोप घेता घेता जातो उतू जिव्हाळा;
भेट कदाचित माझी त्यांना नको आणखी.

ज्याच्या खालुन जाता येता जीव घाबरे;
त्या वृक्षाची काळी छाया नको आणखी.