नाही दिवा जरीही पडक्या घरात माझ्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नाही दिवा जरीही पडक्या घरात माझ्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

नाही दिवा जरीही पडक्या घरात माझ्या

नाही दिवा जरीही पडक्या घरात माझ्या
संगीत : गायक : रफीक शेख



नाही दिवा जरीही पडक्या घरात माझ्या;
मी सूर्य पाळलेला आहे उरात माझ्या.

ओवाळुनी जिवाला मी टाकणार होतो;
नाही अजून आली दारी वरात माझ्या.

हे देह जाळणारे गाणे कसे म्हणू मी?
आक्रोश नववधूंचा येतो स्वरात माझ्या!

ज्यांची उद्या भरारी छेदेल अंबराला;
संचारली हवा ती ह्या पाखरात माझ्या!

होईल काय याचा अंदाज काय घेतो?
खवळून फक्त पाणी बघ सागरात माझ्या!

बघतो अता कसा हा पाऊस येत नाही;
मी वीज पेरली रे ह्या वावरात माझ्या.
---------------------------------------------
('अनुष्टुभ्' दिवाळी 1982 )

■ लेखन : ५ सप्टेबर १९८२