हद्द झाली उधार खाण्याची लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हद्द झाली उधार खाण्याची लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

हद्द झाली उधार खाण्याची

हद्द झाली उधार खाण्याची
जाळते काळजी किराण्याची.

थांब डोळे भरून पाहूदे
काय घाई लगेच जाण्याची.

काम सोडू नको हमालीचे
सोय लावेल कोण दाण्याची?

दोष मातीवरी नका लावू
वांझ थैली निघे बियाण्याची.

पळवली प्रेमिका दिवाण्याने
पत्रिका ना जुळे शहाण्याची.

तडफडे पाखरू तहानेने
ओल नाही कुठेच पाण्याची.