चाणाक्ष ह्या हवेचा श्वासात धाक ठेवा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चाणाक्ष ह्या हवेचा श्वासात धाक ठेवा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

चाणाक्ष ह्या हवेचा श्वासात धाक ठेवा


चाणाक्ष ह्या हवेचा श्वासात धाक ठेवा;
चालेल जीव गेला,शाबूत नाक ठेवा.

गर्भार दूर हेले, गोठ्यात वांझ गाई
चालेल दूध गेले,शाबूत ताक ठेवा.

कर्जात शेत गेले,व्याजात बैल गेले;
चालेल चाक गेले,शाबूत आख ठेवा.

पत्रात येत नाही आता जरी खुशाली;
चालेल टाचलेली,शाबूत डाक ठेवा.

येणार पीक बहिरे मातीत भामट्यांच्या;
चालेल पेरलेली,शाबूत हाक ठेवा.

पोटात माणसांनी काटे कसे भरावे?
चालेल चूल गेली,शाबूत राख ठेवा.
---------------------------------------
('अनुष्टुभ्' दिवाळी 1980)