हसण्यावाचुन जगी आपले कोणी नसते भाई लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हसण्यावाचुन जगी आपले कोणी नसते भाई लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

हसण्यावाचुन जगी आपले कोणी नसते भाई

हसण्यावाचुन जगी आपले कोणी नसते भाई;
जगण्यासाठी आधाराला हसणे असते भाई.

पैसाअडका, नातीगोती, सगेसोयरे खोटे;
मैत्र तेवढे हसण्याचे ते सच्चे दिसते भाई.

ज्याला जमले हसणे त्याचे सुंदर झाले जगणे;
आले नाही हसता त्याचे जगणे फसते भाई.

वाण हसूचा छान जमवितो जगण्यासोबत सौदा;
शिवले ज्याने ओठ तयाचे दुकान बसते भाई.

लाख होउ दे सभोवताली उजाड बागबगीचे;
गाव फुलांचे मनात हस-या अमुच्या वसते भाई.

(’गुलाल आणि इतर गझला’ या संग्रहाच्या मलपृष्ठावरील गझल)