आजकाल वाटती ना मला खरे दिवस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आजकाल वाटती ना मला खरे दिवस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आजकाल वाटती ना मला खरे दिवस


आजकाल वाटती ना मला खरे दिवस;
यायचे कधी प्रिये आपले बरे दिवस.

देहविक्रयावरी रात्र सांज भागवी;
थंड बैसला मुका काय हा करे दिवस?

बेगडी प्रकाश अन् बेगडीच सूर्य हा-
दाटल्या तमातला आज गुदमरे दिवस

पापण्यापल्याडची झेलता व्यथाफुले
लोचनात हास-या हळूच पाझरे दिवस.

वाटते पिकावरी टोळधाड यायची;
एरवी उगाच ना फार थरथरे दिवस.

रात्र उंदिरापरी काळजास कुरतडे
अन् सुळावरी जसा रोजचा सरे दिवस.