प्रेमात ठेव पोरी व्यवहार पारदर्शी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेमात ठेव पोरी व्यवहार पारदर्शी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

प्रेमात ठेव पोरी व्यवहार पारदर्शी

प्रेमात ठेव पोरी व्यवहार पारदर्शी
होईल मग सुखाचा संसार पारदर्शी 
.
प्रत्येक ग्राहकाला कापू नको दुकानी
थोडा तरी असू दे व्यापार पारदर्शी
.
ना द्वेष शुद्ध तुमचा, ना प्रेम शुद्ध तुमचे
सांगा करू कशाची तक्रार पारदर्शी
.
प्रत्यक्ष होत नाही कल्याण का प्रजेचे
राजा तुझा नसावा दरबार पारदर्शी
.
चेंडूस एकदा ने वैकुंठ दाखवाया
तू मार पांडुरंगा षटकार पारदर्शी
.