तुझ्या हासण्याचे दिवाणे किती? लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
तुझ्या हासण्याचे दिवाणे किती? लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

तुझ्या हासण्याचे दिवाणे किती?

तुझ्या हासण्याचे दिवाणे किती
संगीत : गायक : प्रा. हर्षवर्धन मानकर



तुझ्या हासण्याचे दिवाणे किती
संगीत : गायक : मदन काजळे



तुझ्या हासण्याचे दिवाणे किती : संगीत : गायक : प्रा.हर्षवर्धन मानकर



तुझ्या हासण्याचे दिवाणे किती : संगीत : गायक : दिनेश अर्जुना


.

तुझ्या हासण्याचे दिवाणे किती?
तुझे चाहते कोण जाणे किती!

मला चार गोष्टी सदा सांगती;
तुझे दोन डोळे शहाणे किती.

मला नाव माझे स्मरेना प्रिये;
तुला पाठ झाले उखाणे किती!

किती जीवघेणा अबोला तुझा;
मला जाळण्याचे बहाणे किती!

गझल, गीत, कविता, रुबाई अशी-
तुझी राहण्याची ठिकाणे किती.

मला जात माझी विचारू नको;
तुझे उंच आहे घराणे किती.

...........................................
लेखन : १४ सप्टे. २००९