दर्शने देतोस नुसती कोरडी का ईश्वरा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दर्शने देतोस नुसती कोरडी का ईश्वरा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

दर्शने देतोस नुसती कोरडी का ईश्वरा

दर्शने देतोस नुसती कोरडी का ईश्वरा;
वाळवंटी तापल्या दे एक पाण्याचा झरा.

काय झाले सांग पोरी, सोसणे आहे गुन्हा;
फाटलेले पोलके अन् देह कां हा कापरा?

तूच जाशी आश्रयाला भरजरी वस्त्रांकडे;
फाटका मी सांग मागू मग कुणाला आसरा?

लावतो तू रोप मग का वाढल्यावर तोडतो;
जन्मदाता तू खरा की जीवघेणा तू खरा?

काव्य रचतो संगणक अन् यंत्र मानव दाद दे;
दूर नाही वेळ ऐसी, दूर हो रसिका जरा!