जे शोध भाकरीचा घेण्या घरून गेले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जे शोध भाकरीचा घेण्या घरून गेले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

जे शोध भाकरीचा घेण्या घरून गेले

जे शोध भाकरीचा घेण्या घरून गेले;
हे वृत्त आज आले की ते मरून गेले.


नावा किती बुडाल्या त्याचा हिशोब नाही;
पण दीपस्तंभ सारे सागर तरून गेले.


गावात पापण्यांचा दुष्काळ कोरडा हा-
वाटे जरी रडावे अश्रू सरून गेले.


हा चेहरा तुझाही मळकाच वाटतो रे;
आयुष्य का तुझेही ते वापरून गेले.


वेगात खूप तूही वाहू नकोस वा-या;
फाटेल आणखी हे लक्तर विरून गेले.


मेंदूस सर्व त्यांच्या झाला लगेच लकवा;
तुमचे विचारवारे ज्यांच्यावरून गेले.

-------------------------------------------
('दृष्टी'दिवाळी 1983)

■ लेखन : २५ जून १९८३