* दुःखी असून मी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
* दुःखी असून मी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

* दुःखी असून मी

दुःखी असून मी 

जगतो हसून मी

हा दोष ना तुझा 

गेलो फसून मी

हृदयात बघ तुझ्या 

आहे वसून मी

ये, वाट पाहतो 

येथे बसून मी

नाहीस एकटी 

सोबत नसून मी

माझाच शोध पण 

घेतो कसून मी!