१८.१.२३

* दुःखी असून मीदुःखी असून मी 

जगतो हसून मी


हा दोष ना तुझा 

गेलो फसून मी


हृदयात बघ तुझ्या 

आहे वसून मी


ये, वाट पाहतो 

येथे बसून मी


नाहीस एकटी 

सोबत नसून मी


माझाच शोध पण 

घेतो कसून मी!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: