१८.१.२३

* बांधते या उरी मी व्यथांचे झुलेबांधते या उरी मी व्यथांचे झुले 

माळते रोज मी वेदनांची फुले


काळजाने दिली गंथवार्ता मला 

घाव आता तुझे मोहरू लागले


लोचनांनी दिला ऐनवेळी दगा 

आसवांचे धुके भोवती दाटले


रोज ठेवेवरी ठेच लागे जरी 

मी न मागे कधी घेतली पाउले


पानांची तनू मी अशी देखणी 

आज माझ्यावरी दुःखही भाळले!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: