२०.१.२३

* नकळत सुंदर नाते जुळतेनकळत सुंदर नाते  जुळते ,तुला कळेना,मला कळेना;

कोण कुणाच्यासाठी झुरते,तुला कळेना,मला कळेना.

.

मनात जखमी भिरभिर उडते तहानलेले एक पाखरू;

त्या चोचीला कविता स्फुरते तुला कळेना,मला कळेना.

.

अवचित येता सर वळवाची,गंधित व्हावी ओली माती;

तसेच काहीबाही स्मरते तुला कळेना,मला कळेना.

.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: