शेकहॅन्ड त्याच्याशी केला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शेकहॅन्ड त्याच्याशी केला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शेकहॅन्ड त्याच्याशी केला

शेकहॅन्ड त्याच्याशी केला
पंजा माझा चोरी गेला

लाभ लाटण्या दोन्हीकडचे
याला झेला त्याला झेला

मधात फसला जीव बिचारा
मागे लोचा पुढे झमेला

पृथ्वीवरती भांडण झाले
खटला लढवत स्वर्गी नेला

ताटाला एकादशी घडे
पाणी पिऊन निजला पेला

गादीखाली बॉम्ब ठेवतो
तोच गुरूचा पक्का  चेला