बापाची किंमत नाही लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बापाची किंमत नाही लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बापाची किंमत नाही

बापाची किंमत नाही
बेट्याला बरकत नाही
.
कर्णाचा वंशज आहे
पण त्याची दानत नाही
.
शब्द चार दे प्रेमाचे
धनदौलत मागत नाही
.
सांग करावे प्रेम कधी ?
रोबोला फुरसत नाही !
.
पायांवर पाडा धोंडे
हातांची हरकत नाही
.
तोंड चोपडा दुनियेचे
त्याविन ती मानत नाही
.
मिटवील अक्षरे माझी
काळाची हिम्मत नाही