नाही कधी कुणाची होणार राजनीती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नाही कधी कुणाची होणार राजनीती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

नाही कधी कुणाची होणार राजनीती

नाही कधी कुणाची होणार राजनीती;

वेश्येपरी बदलते आचार राजनीती.


प्रेमात रोज सौदा,मैत्रीत रोज धोका;

करणार भावनांचा व्यापार राजनीती.


साडी असेल ह्याची,चोळी असेल त्याची;

मांडेन कुंकवाचा बाजार राजनीती.


तू पाय चाट वेड्या तेव्हा मिळेल पेढा;

लाचार मस्कर्‍यांना आधार राजनीती.


पत्नी-मुलास देते सत्तेपुढे बळी अन्

जाळून टाकते ही घरदार राजनीती.


सडवून धान्य त्याची गाळेन मस्त दारू;

लुटवून देत नाही कोठार राजनीती.

    -