सोन्यास काय चाटू खाऊ कसे हिर्‍याला? लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सोन्यास काय चाटू खाऊ कसे हिर्‍याला? लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोन्यास काय चाटू,खाऊ कसे हिर्‍याला?

सोन्यास काय चाटू,खाऊ कसे हिर्‍याला?


श्रीमंत देव तुमचे लखलाभ ते तुम्हाला.



तू सांग थोर गोष्टी बाहेरच्या जगाला;


ठाऊक तू कसा रे आहे तुझ्या मनाला.



संसार मांडण्याच्या आधीच मोडला तू;


प्रेमात शेवटी तो व्यवहार आड आला.



पाण्यात पीठ बाळा मी घालते सुखाने;


तू गोड कर मुखाने समजून दूधकाला.



माझे मला न भारी लेंढार लेकरांचे;


का रुक्मिणी म्हणाली त्या बाप विठ्ठलाला?