*इगो - इगोचे भांडण आहे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
*इगो - इगोचे भांडण आहे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

*इगो - इगोचे भांडण आहे

 इगो - इगोचे भांडण आहे

फक्त एवढे कारण आहे


उखळ कुणाचे, मुसळ कुणाचे

सतत मनाचे कांडण आहे


दिसेल त्याला शिंग मारतो

तुटली त्याची वेसण आहे


जादू करती डोळे घारे

मोहक जारणमारण आहे


किती जिवांची झाली माती

काय तुझे हे धोरण आहे ?


गळते छप्पर, झरती डोळे 

कसा जाळतो श्रावण आहे !


द्या कर्जाला माफी राजे

घाम आमचा तारण आहे