काय काय तू गोळा केले आयुष्या रे सटरफटर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
काय काय तू गोळा केले आयुष्या रे सटरफटर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

काय काय तू गोळा केले आयुष्या रे सटरफटर

काय काय तू गोळा केले आयुष्या रे सटरफटर ;
गझला,गाणी, कविता,पत्रे,ग्रंथ बिचारे सटरफटर .

पटलेल्यांना जीव लाव तू, हुकलेल्यांना टाटा कर ;
सवाल नाजुक सोडव प्रेमा, अशा प्रकारे सटरफटर.

भिंतीपाशी रडती भिंती सांगत गोष्टी दुःखाच्या  ;
घराघराची किरकिरणारी खिडक्या - दारे सटरफटर.

वीज बांधतो मिठीत कोणी भाग्यवान तो एखादा ;
उल्का होउन कोसळणारे कितीक तारे सटरफटर.

थेंबाथेंबासाठी वणवण मरता मरता बायांनो,
'मुली वाचवा मुलीस शिकवा ' ऐका नारे सटरफटर.

सुखदुःखाला साक्षी राहे तोच विठोबा खरा तुझा ;
भोजनभाऊ खाण्यापुरते बाकी सारे सटरफटर.