हात हाती असे धरू आपण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हात हाती असे धरू आपण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

हात हाती असे धरू आपण

हात हाती असे धरू आपण;
आपला तोल सावरू आपण.

भांडलो खूप एकमेकांशी;
प्रेम थोडे तरी करू आपण.

मी रिकामा गडे, रिकामी तू;
दोन पेले रिते भरू आपण.

वाळवंटात हाच ओलावा;
नेत्र पाणावले स्मरू आपण.

सारख्या शेवटी कथा सा-या;
लांबली गोष्ट आवरू आपण.

शस्त्र हाती दिले तुकोबाने;
शब्द तोलून वापरू आपण.

____________________________