शहराला मरणाची घाई लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शहराला मरणाची घाई लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शहराला मरणाची घाई

शहराला मरणाची घाई;
सवड काढ जगण्याला बाई

हृदयावरती टांगा पाटी:
रहदारीला सक्त मनाई.

असे वाटते तुझे भेटणे-
भिकारड्याला जशी मिठाई.

सर्व चेहरे एकसारखे;
गाय कोणती? कोण कसाई?

घाव खोल अन् जखमा ओल्या;
इतिहासाची हीच कमाई.