स्वतःला मेलो इतकं सुतकी राहू नये कधी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
स्वतःला मेलो इतकं सुतकी राहू नये कधी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

स्वतःला मेलो इतकं सुतकी राहू नये कधी

स्वतःला मेलो इतकं सुतकी राहू नये कधी
व्यथेच्या ऐनेमहालात प्रिया पाहू नये कधी
.
येणार असते चांदणी अनाहूत अंधारात
निखळत्या उल्केच्या वाटेला जाऊ नये कधी
.
हरेक ओठांना चुंबित नसते रे गझल
खुशालीत तिच्या तिला गाऊ नये कधी
.
उमलत्या फुलांचे आहे निर्माल्य ठरलेले
उगाच दोष उन्हाला लावू नये कधी
.
आपसुक रंगत जाते मेंदी रक्तात पेटून
स्वतःच्या खांद्यावर चितेला वाहू नये कधी
.

('युगवाणी 'ऑगष्ट -सप्टेबर ७८)