लागला मोठा जिवाला घोर होता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लागला मोठा जिवाला घोर होता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

लागला मोठा जिवाला घोर होता

लागला मोठा जिवाला घोर होता
जीवघेणा ओळखीचा चोर होता

झोपलेली भूक भाजीची उपाशी
भाकरीशी भांडला चतकोर होता

भाग होते जिंकणे सैन्यास माझ्या
कापला मी वापसीचा दोर होता

सापडेना नीच  त्याच्याहून कोणी
तेवढे सोडून बाकी थोर होता

नोकरीला बांधली लांडोर होती
लेकरे सांभाळणारा मोर होता