कालची बातमी ऐकली का लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कालची बातमी ऐकली का लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

कालची बातमी ऐकली का

कालची बातमी ऐकली का ?
थाप कोरी नवी ऐकली का ?
.
रामपारी अज़ाँ ऐकतो मी
सांग तू आरती ऐकली का ?
.
टाळ कुटले किती लाखवेळा
एकदा लावणी ऐकली का ?
.
फूल दिसले तुला वाहिलेले
घातलेली शिवी ऐकली का ?
.
वाजताना डिजे,ढोल - ताशे
मारली हाक मी ऐकली का ?
.
ऊठ माझ्या जिवा, लाग चालू
लागली भैरवी ऐकली का ?