तुझी दूर झाली पराधीन काया लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
तुझी दूर झाली पराधीन काया लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

तुझी दूर झाली पराधीन काया

तुझी दूर झाली पराधीन काया
इथे सोबतीला तुझी फक्त छाया

तशी राहिली ना हवा ही सुगंधी
उरे अत्तराचा रिकामाच फाया

कुठे सांग माळू अता मोगरा मी
तुझ्यावीण गेली फुले रोज वाया

किती मालवू मी दिवे आठवांचे
पुन्हा लागती ते मला चेतवाया

कधी श्वास वाटे जरा थांबलेला
कधी प्राण माझा बघे हा उडाया