कुणाची आर्त किंकाळी कसा आवाज हा आला? लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कुणाची आर्त किंकाळी कसा आवाज हा आला? लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

कुणाची आर्त किंकाळी? कसा आवाज हा आला?

कुणाची आर्त किंकाळी? कसा आवाज हा आला?
कशी ही पेटली होळी? नभाला झोंबती ज्वाला.

नव्या या उंब-यावरती जळे पाऊल लक्ष्मीचे ;
कुणी हे लावले आहे इथे रॉकेल मापाला?

नखाने दाबला नाही गळा तान्हेपणी आई;
अता हा फास सोन्याचा भिडे शोभून कंठाला!

मण्यांची आण घे काळ्या नको तू नाव सांगू गं;
जरी कुंकातली लाली डसे गो-या कपाळाला.

टिळे लावून रक्ताचे, भरा ओट्या निखा-यांनी;
कुणी घासात निर्दोषी जरा ‘पोटॅश’ ही घाला.

क्षणाची ही कशी पत्नी? अनंताची कशी माता?
कसे सौभाग्य हे आहे? दुधाचा कोळसा झाला!
------------------------------------------------------
('मराठवाडा' दिवाळी 1984)