येथे असा कसा हा सांगा वसंत आला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
येथे असा कसा हा सांगा वसंत आला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

येथे असा कसा हा सांगा वसंत आला

येथे असा कसा हा सांगा वसंत आला;
बागेतल्या फुलांचा उमलून अंत आला!

झाली हसावयाची हल्ली इथे मनाई;
तो थेंब आसवाचा घेऊन खंत आला!

होणार लूट यंदा यात्रेत भाविकांची;
ह्या मंदिरात कोणी भोंदू महंत आला.

ढोंगी बहूरुप्यांचे हे चेहरे दुतोंडी;
मज एक चेहराही नाही पसंत आला!

पाण्यात पाहणारे वाहून सर्व गेले;
होऊन वाफ जो तो माझ्यापर्यंत आला!

तुमचे स्मशान नक्की झाले निरूपयोगी;
त्याच्याशिवाय नाही मुडदा जिवंत आला!

■ लेखन : ८ ऑक्टोबर १९८०