हवेने उडवले छप्पर पुराने पाडल्या भिंती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हवेने उडवले छप्पर पुराने पाडल्या भिंती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

हवेने उडवले छप्पर,पुराने पाडल्या भिंती

हवेने उडवले छप्पर,पुराने पाडल्या भिंती
घराचे पोट भरणारे हवापाणी कुठे आहे ?

दवाखाने किती केले,किती केल्या तुझ्या वाऱ्या
जिवाला चैन देणारे दवापाणी  कुठे आहे ?

कितीदा मारतो चकरा, कितीदा लावतो लोणी;
गती कामास देणारे 'चहापाणी' कुठे आहे?

सकाळी उतरते साली किती प्या शुद्ध मोहाची
दुखाला पुरून  उरणारे नशापाणी कुठे आहे?