*येशील काय शोधत पत्ता कधीतरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
*येशील काय शोधत पत्ता कधीतरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

*येशील काय शोधत पत्ता कधीतरी

येशील काय शोधत पत्ता कधीतरी

देशील काय थोडा* दिलासा कधीतरी

झालो गहाळ मी बघ गर्दीत येथल्या 

लागो मलाच माझा* सुगावा कधीतरी

हिस्सा सुखातला तर होता  दिला तुला

दुःखातला घे* तू मग वाटा कधीतरी

झाल्याशिवाय बाप न कळणार दुःख हे

होशील बाप तू पण बेट्या कधीतरी