१९.१.२२

*येशील काय शोधत पत्ता कधीतरी

येशील काय शोधत पत्ता कधीतरी

देशील काय थोडा* दिलासा कधीतरी


झालो गहाळ मी बघ गर्दीत येथल्या 

लागो मलाच माझा* सुगावा कधीतरी


हिस्सा सुखातला तर होता  दिला तुला

दुःखातला घे* तू मग वाटा कधीतरी


झाल्याशिवाय बाप न कळणार दुःख हे

होशील बाप तू पण बेट्या कधीतरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: