जिंकायाच्या कशा लढाया शिकून घे तू. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जिंकायाच्या कशा लढाया शिकून घे तू. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

जिंकायाच्या कशा लढाया शिकून घे तू

जिंकायाच्या कशा लढाया शिकून घे तू.
जखमांकडून गनिमी कावा शिकून घे तू.
.
आईच्या पोटात धड्यांचे पुस्तक नसते
अनुभवातून गिरवत कित्ता शिकून घे तू.
.
इमानदारी, हरामखोरी, दुनियादारी ;
पडेल कामी हरेक विद्या शिकून घे तू.
.
जीवन नसते देत कुणाला दुसरी संधी
सोने करण्याची ती किमया शिकून घे तू
.
कसे लागते जगण्यासाठी विष पचवावे
मला पहा अन् जरा शंकरा शिकून घे तू.
.