जे जे समोर येते स्वीकार सर्व काही लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जे जे समोर येते स्वीकार सर्व काही लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

जे जे समोर येते स्वीकार सर्व काही

जे जे समोर येते स्वीकार सर्व काही;
नाकारल्यास मित्रा ते दुःख तीव्र होई.

पाठीवरी अपेक्षा,डोक्यावरी समस्या;
अश्रू पुसून ओली झाली असेल बाही.

गर्दी असून रस्ता सुनसान वाटणारा;
पाहू नको तरीही मागे वळून बाई.

दु:खास धर्म नसतो,ना जात वेदनेला;
हे मर्म जाणणारा सर्वज्ञ मानतो मी!

ते यार चार खांदे अन् दोन उष्ण अश्रू;
ही एवढीच होती माझी खरी कमाई.


('मीडिया वाॅच' दिवाळी २०१५)