* मीठन् मिरच्या लावुन त्यांना चाटू का मी ? लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
* मीठन् मिरच्या लावुन त्यांना चाटू का मी ? लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

* मीठन् मिरच्या लावुन त्यांना चाटू का मी ?

 मीठन् मिरच्या लावुन त्यांना चाटू का मी ?

कविता-फविता गझला- बिझला खाऊ का मी ?

रंग-ढंग मी तुझे झेलले पोरांसाठी

उरलेसुरले सांग कपाळी गोंदू का मी ?

असेल मोठे नाव तुझे रे ; काय फायदा ?

करून त्याची भाजी-पोळी जेवू का मी ?

दांड घातला, गाठि मारल्या, विरली साडी

मासोळीचे जाळे झाले, नेसू का मी ?

संसाराचा केला विचका हाताने तू

उगाच त्याचा दोष नशीबा लावू का मी ?