वेडेपण हे करू नको लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वेडेपण हे करू नको लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

वेडेपण हे करू नको

वेडेपण हे करू नको;
विस्तव हाती धरू नको.



प्राण लावला पणास तू;
आता मागे सरू नको.



कुठेच नाही कल्पतरू;
त्याच्यासाठी झुरू नको.



जिकडे तिकडे गाळ इथे;
खोलामध्ये शिरू नको.



रांगोळी जर नकार दे;
रंग गुलाबी भरू नको.


अनुभव शिक्षक असे खरा;
दुसरा कोणी गुरू नको

दु:खाला पर्याय नसे;
उगाच शोधत फिरू नको.