छतांच्या मर्त्य डोळ्यांना व्यथांच्या लागती धारा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
छतांच्या मर्त्य डोळ्यांना व्यथांच्या लागती धारा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

छतांच्या मर्त्य डोळ्यांना व्यथांच्या लागती धारा

छतांच्या मर्त्य डोळ्यांना व्यथांच्या लागती धारा;
म्हणे आकाश सोनेरी घरांना आणखी मारा.


कधी आसूड पाठीवर, कधी पोटावरी लाथा;
कधी या चंद्रमौळींच्या दिव्यांना झोंबतो वारा.


नको पाया पडू माझ्या, तुला मी पावलो देवा,
तुलाही रक्तमांसाचा हवा का सांग देव्हारा?


नव्याने पेटला वणवा, जळाले कोंब आशेचे;
पुन्हा रानात पोटाच्या भुकेला चावला चारा.


खुळे हे ज्ञान माझे अन् खुजे विज्ञानही माझे;
थिट्या चिमटीत प्रज्ञेच्या धरावा मी कसा पारा.

------------------------------------------------------
('दिशा' दिवाळी 1984)