धीर धरावा सांगा कुठवर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
धीर धरावा सांगा कुठवर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

धीर धरावा सांगा कुठवर

धीर धरावा सांगा कुठवर
जीव आतला कापे थरथर

श्वास  घेइना फूल सुखाने
चार पाकळ्या झाल्या उपवर.

अभिनेत्यांचे हुकमी अश्रू
नकोस घेऊ कधी मनावर.

डोंगर अवघा आहे पोकळ
किती साजरा दिसतो वरवर.

फ्लॅट,कारचे थकले हप्ते
जॉबहि गेला, झाला बेघर